काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिमांचा वापर!

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिमांचा वापर!

मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना भारतीय जनता पार्टीची भीती दाखवून मते मिळवली आणि मुस्लिमांना फसवले. काँग्रेस - राष्ट्रवादीची ही फसवणूक उघडकीस आणणाऱ्या ‘आपकी दुश्मनी कुबूल, हम आपकी दोस्ती से डरते है’ या चौधरी चांदपाशा यांनी लिहिलेल्या पुस्तिकेच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन गुरुवारी (ता. 26) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे होणार आहे.

भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. चौधरी चांदपाशा यांनी राज्यातील राजकीय स्थितीचा व मुस्लिम समाजाला मिळालेल्या प्रतिनिधित्वाचा बारकाईने अभ्यास केला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला भाजपाची भीती दाखवून मते मिळवली पण मुस्लिम समाजाला नेतृत्वाची संधी मात्र दिली नाही तर उलट मुस्लिम समाजाचे खच्चीकरण केले, असे चौधरी चांदपाशा यांना आढळले. त्यांनी या पुस्तिकेत राज्यभरातील नेतृत्वाच्या संधीची आकडेवारी दिली आहे. त्यांना आढळले की, राज्यातील 141 सहकारी साखर कारखान्यांपैकी एकमेव मुस्लिम चेअरमन असून ते भाजपाचे आहेत. राज्यातील 306 कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी केवळ 3 मुस्लिम सभापती असून ते सुद्धा भाजपाचे आहेत. राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये एक जिप उपाध्यक्ष मुस्लिम आहेत व ते भाजपाचेच आहेत. तीन नगराध्यक्ष, तीन जिप सदस्य अशा मुस्लिमांना भाजपानेच संधी दिलेली आहे. पण मुस्लिमांच्या मतांवर विजय मिळविणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुस्लिमांना नेतृत्वाची संधी दिलेली नाही, हे चौधरी चांदपाशा यांनी पुराव्यानिशी मांडले आहे.

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिमांना भाजपाची भिती दाखवून मते मिळवते पण निवडणुकीनंतर सत्तेसाठी भाजपाशी संधान साधायला कमी करत नाही, हे सुद्धा त्यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. चौधरी चांदपाशा यांच्या या पुस्तिकेला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तिकेच्या या आधीच्या आवृत्त्यांनी राजकारणात खळबळ निर्माण केली होती. 

प्रकाशन समारंभास भाजपा अल्पसंख्य आघाडीचे सरचिटणीस सिकंदर शेख, महाराष्ट्र मुस्लिम संघाचे फकीर महंमद ठाकूर, पर्यटन महोत्सवाचे अध्यक्ष शेख जाकीर हुसेन तसेच मकबूल वलांडीकर, मौलाना मुफ्ती अब्दुल रहमान मिल्ली, हाजी बशीर कुरेशी आणि सलीम अलवारे उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com