कॉंग्रेसच्या पराभुतांचे पुन्हा गुडघ्याला बाशिंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीत अनेकदा कॉंग्रेसकडून निवडणूक लढून अपयशी ठरलेले उमेदवार पुन्हा सज्ज झाले आहेत. फेब्रुवारीतील निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सतत पराभूत होणाऱ्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यास कॉंग्रेसमधील नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही विरोध दर्शवला आहे.

शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 206 मधून कॉंग्रेसतर्फे लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत. यापूर्वी तीन वेळा अपयशी ठरलेले रामवचन मुराई हेसुद्धा उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणला आहे. धारावी विधानसभा मतदारसंघातील 184 या प्रभागातील दीपक काळे अनेकदा पराभूत झाले आहेत. त्यांनीही पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध आहे.

Web Title: congress candidate interested in municipal election