काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे बांधणार शिवबंधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून, मातोश्री येथे हा पक्षप्रवेश केला जाणार आहे. लोकरे यांनी कार्यकर्त्यांची आज बैठक घेऊन कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं.

मुंबई : मुंबईतील मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक 141 येथील काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका सुनंदा विठ्ठल लोकरे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत, सोमवारी शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून, मातोश्री येथे हा पक्षप्रवेश केला जाणार आहे. लोकरे यांनी कार्यकर्त्यांची आज बैठक घेऊन कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. नगरसेवक विठ्ठल लोकरे आणि माजी नगरसेविका सुनंदा लोकरे यांनी काल आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress corporater Vitthal Lokare may be enters Shivsena