काँग्रेसने का वाटले "लाडू"?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

आज दादरमधील टिळक भवन येथे राजू वाघमारे यांच्या नेतृत्वात "लाडू वाटपाचा" कार्यक्रम पार पडला.यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडू वाटपाचा हा कार्यक्रम घेऊन काँग्रेसने नैराश्य झटकण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा उभारी घ्यायचा निश्चय केला आहे. 

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजप मध्ये प्रवेश करत असतांना काँग्रेसने मात्र आज चक्क "लाडू वाटप" कार्यक्रम घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून केवळ गद्दार नेते भाजपमध्ये गेले असल्याचे सांगत काँग्रेसने "लाडू वाटप" करत आनंदोत्सव साजरा केला.

काँग्रेस पक्षातून काही संधीसाधू व स्वार्थी मंडळी पक्षाशी गद्दारी करून भाजपात प्रवेश करीत आहेत. अशी मंडळी गेल्यामुळे काँग्रेस पक्षात तसेच कार्यकर्त्यात चिंतेचे व दुःखाचे वातावरण आहे अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या आहेत. आमचा आमच्या पक्षाच्या विचारधारेवर व पक्ष नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे आमच्या पक्षात असे कोणतेही दुःखाचे वातावरण नसून उलट असे लोक गेल्यामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता राजू वाघमारे यांनी दिली.

आज दादरमधील टिळक भवन येथे राजू वाघमारे यांच्या नेतृत्वात "लाडू वाटपाचा" कार्यक्रम पार पडला.यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडू वाटपाचा हा कार्यक्रम घेऊन काँग्रेसने नैराश्य झटकण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा उभारी घ्यायचा निश्चय केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress distributes laddu at Mumbai