डॉ. नितीन राऊत : विदर्भातील कॉंग्रेसचा मागासवर्गीय चेहरा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात

डॉ. नितीन राऊत : विदर्भातील कॉंग्रेसचा मागासवर्गीय चेहरा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार याबाबत घोषणा झाली आणि चर्चा सुरु झाल्यात उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची.  यामध्ये कॉंग्रेसतर्फे नितीन राऊत, अनिल देशमुख, सुनील केदार आणि आमदार आशीष जयस्वाल यांची नावं सातत्याने पुढे येताना पाहायला मिळत होती. मात्र या सर्वांमध्ये नितीन राऊत यांची आज मंत्रिपदासाठी वर्णी लागलेली पाहायला मिळाली. 

आज कॉंग्रेसतर्फे कॉंग्रेसचा विदर्भाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या आमदार नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार नितीन राऊत हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आहेत. नितीन राऊत हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत. विदर्भातील कॉंग्रेसचा चेहरा आणि मागासवर्गीय नेता म्हणून राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय. नितीन राऊत यांनी या आधीच्या आघाडीच्या (कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी) कार्यकाळात रोजगार हमी व जलसंवर्धनमंत्री म्हणून पद भूषवलं आहे. 

नुकताच शरद पवार यांनी दुष्काळ पाहणीसाठी विदर्भाचा दौरा केला होता. या दौर्यामध्ये शरद पवार यांनी नितीन राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. 

दरम्यान आज शिवतीर्थावर म्हणजेच मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये कॉंग्रेसतर्फे नितीन राउत आणि बाळासाहेब थोराथ, शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई आणि राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी देखील आज मंत्रिपदाची  शपथ घेतली. यापुढील मंत्रिमंडळविस्तार हा बहुमत चाचणी नंतर म्हणजेच पुढील महिन्यात होताना पाहायला मिळणार आहे.  

WebTitle : congress face of vidarbha nitin raut took oath as cabinet minister of maharashtra at shivaji park 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com