कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते; अहमद पटेल यांच्या निधानावर राज ठाकरेही हळहळले

पूजा विचारे
Wednesday, 25 November 2020

अहमद पटेल यांच्या निधनाचे महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ट्विटरवर राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी शोक संदेश पोस्ट करून राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

मुंबईः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून अहमद पटेल यांची ओळख होती. अहमद पटेल यांच्या निधनाचे महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ट्विटरवर राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांनी शोक संदेश पोस्ट करून राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.  

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनानं निधन झांल. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहिर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की, त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. 43 वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतःच्या सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली.

अधिक वाचा-  प्रताप सरनाईक मुंबईबाहेरुन आल्यानं क्वारंटाईन, ईडीला विनंती पत्र सादर करणार
 

अहमद पटेल यांना मागील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल याने वडिलांचे दु:ख निधन झाल्याची माहिती दिली. 

Congress leader ahmed patel died mns chief raj thackeray emotional tribute post twitter


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader ahmed patel died mns chief raj thackeray emotional tribute post twitter