राजभवनाबाहेर आंदोलनपूर्वी काँग्रेस नेते ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress leader detained before protest outside Raj Bhavan

राजभवनाबाहेर आंदोलनपूर्वी काँग्रेस नेते ताब्यात

मुंबई - शुक्रवारी 5 ऑगस्टला महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरवाढ आणि बेरोजगारी या मुद्द्यावरून केंद्रसरकार विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईतील राजभवनासमोर आंदोलन करण्यात येणार होते.आंदोलनापासून रोखण्यासाठी पोलिसांनी विधानभवनाच्या बाहेर जमलेल्या काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मुंबई पोलिसांनी कलम 149 अंतर्गत नोटिसा बजावल्या.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे आदी वरिष्ठ नेते आंदोलनाला उपस्थित होते. नेत्यांना ताब्यात घेतल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

गुरुवारी 4 ऑगस्टला जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार हा मोर्चा हँगिंग गार्डनपासून सुरू होऊन सकाळी ११ वाजताच्या सुमारास राजभवनावर संपणार होता. काँग्रेस नेत्यांची बैठक झालेल्या विधानभवनाच्या बाहेर, राज्य विधिमंडळ संकुलाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, काही किलोमीटर अंतरावर असलेल्या राजभवनाकडे जाण्यापासून पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी मुंबईतील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना कलम 149 अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून एकाच ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना जमण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते.

Web Title: Congress Leader Detained Before Protest Outside Raj Bhavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..