Vidhan Sabha 2019 : संजय निरुपम यांची काँग्रेसला धमकी

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे आज जाहीर केले. पक्षातही फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले.

मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे आज जाहीर केले. पक्षातही फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले.

मुंबईत भाजपमध्ये राडा: उमेदवाराच्या गाडीवर दुसऱ्या गटाचा हल्ला

काय म्हणाले निरुपम?
देवरा यांचे कॉंग्रेसमधील स्थानिक नेत्यांशी फारसे पटले नाही. त्यांच्यातील वाद अनेकदा चव्हाट्यावर आले होते. निरुपम यांनी देवरा यांच्यावर आज जोरदार टीका केली. निरुपम म्हणाले, ""मी इतक्‍यात पक्षाचा राजीनामा देईन असे वाटत नाही, पण पक्षात अशाच पद्धतीने काम सुरू राहिल्यास मी पक्षात फार काळ राहू शकणार नाही. मी एकाचीच उमेदवारीसाठी शिफारस केली होती, तीही मान्य झाली नाही. या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही मी भाग घेणार नाही.''

राष्ट्रवादीने पिंपरीत उमेदवार बदलला

काय आहे पार्श्वभूमी?
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना निरुपम यांनी आक्रमकपणे काम केले. प्रथम शिवसेनेतर्फे आणि नंतर काँग्रेसतर्फे असे सलग दोनवेळा ते राज्यसभेचे सभासद होते. निरुपम 2009 मध्ये लोकसभेवर निवडून आले. त्यांनी आक्रमकपणे काम केल्याने मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये त्यांची क्रेझ निर्माण झाली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाल्यानंतर त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांची अध्यक्ष पदी नियुक्ती झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा आणि निरुपम यांच्यातील मतभेत चव्हाट्यावर आले. मुंबईत उत्तर लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदांवर मातोंडकर यांनी भाष्य केले होते. या मतभेदांमुळेच पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवरा यांनीही मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. सध्या एकनाथ गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची पात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader sanjay nirupam statement against party press conference