काँग्रेसच्या नेत्याची भिवंडीत क्रूर हत्या (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेतील सभागृह नेते मनोज म्हात्रे (वय 53) यांच्यावर मंगळवारी (ता. 14) रात्री दहाच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर तलवारीनेही वार केले. यात म्हात्रे यांचा मृत्यू झाला.

शहरातील अंजूरफाटा येथील ओसवाल पार्क परिसरात म्हात्रे राहत होते. रात्री घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

भिवंडी महापालिकेत 25 वर्षांपासून नगरसेवक असलेले म्हात्रे काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून परिचित होते. ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. एमएमआरडीएच्या सदस्यपदीही त्यांनी काम पाहिले होते. 

म्हात्रे यांच्यावर रात्री अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी सुरू केली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, दीड वर्षापूर्वीही म्हात्रे यांच्यावर अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केला होता. कामतघर परिसरातील एका नगरसेवकाच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. 

Web Title: Congress Manoj Mhatre Murder Bhiwandi Mumbai

व्हिडीओ गॅलरी