राजभवनाचे तात्पुरते नामकरण करावं का?, काँग्रेसची कडवट शब्दात टीका

पूजा विचारे
Tuesday, 15 September 2020

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी कडवट शब्दात टीका केली आहे. 

मुंबईः  दोन दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर आज निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनीही राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावरुनच काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी कडवट शब्दात टीका केली आहे. 

महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस (RSS) शाखा किंवा भाजप (BJP) कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का, अशा शब्दात टीका भाई जगताप यांनी केली.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा भेटले राज्यपालांना

आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मारहाण करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं. या मारहाणीनंतर भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोलही केला. भाजपनं आंदोलनंही केलं होतं. दरम्यान आज मदन शर्मा यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. 

या भेटीनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शर्मा म्हणाले की, आतापासून मी भाजप-आरएसएस बरोबर आहे. जेव्हा मला मारहाण केली गेली, तेव्हा त्यांनी मी भाजप-आरएसएस बरोबर असल्याचा आरोप केला. म्हणून आता मी जाहीर करतो की मी, आजपासून भाजप-आरएसएस बरोबर आहे.

कांदिवली येथे राहणारे माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या  प्रकरणी ४ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आणि जामीन मिळाला आहे. यामध्ये २ शाखाप्रमुखांचा तर अन्य २ कार्यकर्त्यांचा समावेश होता. या घटनेनंतर भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजपने या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं होतं. 
 

Congress MLA Bhai Jagtap reply the Governor criticism


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Bhai Jagtap reply the Governor criticism