काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे भाजपमध्ये

संजय मिस्किन
सोमवार, 23 जानेवारी 2017

ऐन निवडणूकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, आता हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा निरूपम व कामत गटात दिलजमाई करणार आहेत.

मुंबई - काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे कट्टर समर्थक माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रविवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. 

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का समजण्यात येत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या कार्यपध्दतीवर टीका करत हेगडे यांनी काँग्रेसला रामराम केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे भाजपमध्ये गेले. दरम्यान, काँग्रेस नेते गुरूदास कामत देखील निरूपम यांच्यावर प्रचंड नाराज असून, कोणत्याही क्षणी काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये जातील. असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, आता हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा निरूपम व कामत गटात दिलजमाई करणार आहेत.

Web Title: Congress MLA Krishna Hegde join BJP