कुठं डांबून ठेवलं आमदार श्रीमंत पाटलांना? : यशोमतीताई ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

या प्रकारामुळे संतप्त यशोमतीताई यांनी "कुठे डांबून ठेवलं आहे आमदार पाटील यांना?मला त्यांना भेटायचं आहे, अशी मागणी करून, त्या म्हणाल्या की, अतिदक्षता विभागाऐवजी व्हिआयपी रुममध्ये उपचारासाठी हृदय रोग तज्ञ नाहीत आणि शेकडो पोलिसांचा पहारा हे  नेमकं आहे तरी काय? अशी प्रश्नाची सरबत्ती केली.

मुंबई : कर्नाटकमधील अचानक बेपत्ता झालेले आमदार श्रीमंत पाटील हे हृदयाचा त्रास होत असल्यामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्याने शुक्रवारी रात्री उशीरा आमदार यशोमतीताई त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयामध्ये गेल्या खऱ्या मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला. तर दुसरीकडे उपस्थित डॉक्टरांनी सुद्धा उडवा-उडवीची उत्तरे दिली.

या प्रकारामुळे संतप्त यशोमतीताई यांनी "कुठे डांबून ठेवलं आहे आमदार पाटील यांना?मला त्यांना भेटायचं आहे, अशी मागणी करून, त्या म्हणाल्या की, अतिदक्षता विभागाऐवजी व्हिआयपी रुममध्ये उपचारासाठी हृदय रोग तज्ञ नाहीत आणि शेकडो पोलिसांचा पहारा हे  नेमकं आहे तरी काय? अशी प्रश्नाची सरबत्ती केली.

मात्र सर्वच निरुत्तर झाल्यामुळे, तुम्ही सर्वजण सरकारचे "अर्थपूर्ण लाभार्थी" आहात म्हणूनच घोडेबाजार करण्यात सहभागी असल्याचा,आरोप त्यांनी यावेळी केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Yashomati Thakur meet Karnataka MLA in Mumbai