कॉंग्रेस-'राष्ट्रवादी'चा नोटाबंदीवर जनआक्रोश 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई : कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस काळ्या पैशाच्या विरोधात नाही; पण भाजप सरकार देशभक्‍ती व काळा पैसा यावरून जनतेची दिशाभूल करत आहे. आज अत्यंत सुस्थितीत असलेला देश 'कॅशलेस इकॉनॉमी'च्या नावाने लुटला जात असून, मोदी सरकारने सामान्य जनतेला 'कॅशलेस' केले आहे. स्वत:चा पैसा असून तो वापरण्यावर निर्बंध आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे केली. 

नोटाबंदीविरोधात कॉंग्रेस व 'राष्ट्रवादी'ने आज जनआक्रोश मोर्चा काढला होता. यामध्ये दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेरवाडी जंक्‍शनजवळ या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भाजप सरकारच्या विरोधात जनतेत रोष असून, तो दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण आगामी निवडणुकीत जनता भाजप सरकारला धडा शिकवेल, असा इशारा दिला. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. याला जनतेचा, विविध संघटनांचा प्रतिसाद मिळाला.

Web Title: Congress NCP protests against demonetisation