माझी लढाई विचारधारेशी, ती लढतच राहू : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

आमची लढाई पंतप्रधानांच्या धोरणांविरोधात आहे. ज्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत, युवक बरोजगार आहेत, मोजक्या उद्योगपतींना मदत करण्यात येत आहे. महागाई, पेट्रोल डिझेलचे दर याबाबत मोदी एक शब्द बोलत नाहीत. माझी विचारधारेचे लढाई आहे, ती आम्ही जिंकू.

मुंबई : माझी लढाई विचारधारेशी असून, ती मी लढतच राहणार आहे. ही लढाई आम्ही जिंकू, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज (मंगळवार) भिवंडी न्यायालयात सुनावणीला हजर राहिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 10 ऑगस्टला होणार आहे. न्यायालयाच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोनाळे गावातील मैदानात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी संघावर गांधीजींच्या हत्येचा आरोप केला होता. त्याप्रकरणी संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात त्यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यावर भिवंडी दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. ए. शेख यांच्यासमोर आज सुनावणी झाली.

सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की आमची लढाई पंतप्रधानांच्या धोरणांविरोधात आहे. ज्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत, युवक बरोजगार आहेत, मोजक्या उद्योगपतींना मदत करण्यात येत आहे. महागाई, पेट्रोल डिझेलचे दर याबाबत मोदी एक शब्द बोलत नाहीत. माझी विचारधारेचे लढाई आहे, ती आम्ही जिंकू.

Web Title: Congress President Rahul Gandhi criticize RSS and Narendra Modi