उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला सोनिया गांधी येणार नाहीत, हे आहे कारण  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी अनुपस्थित राहणार आहेत. याबद्दल पत्र लिहून उद्धव ठाकरे यांना कळवण्यात आलंय. आपण शपथविधीसाठी येऊ शकत नसल्याची त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीये. 

काल आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत कॉंग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि  डॉक्टर मनमोहन सिंह यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वतः आदित्य यांनी दिलं. मात्र, सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी अनुपस्थित राहणार आहेत. याबद्दल पत्र लिहून उद्धव ठाकरे यांना कळवण्यात आलंय. आपण शपथविधीसाठी येऊ शकत नसल्याची त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीये. 

सध्याची राजकीय परिस्थिती ही अत्यंत विखारी  झालीये. अशात भारतातील अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. देशातील शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी किमान समान कार्यक्रम बनवत एकत्रित येत सरकार स्थापण्याचा निर्णय घेतलाय.

No photo description available.

किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या काळात तीनही पक्ष महाराष्ट्रातील जनतेसाठी एकत्रित काम करताना पाहायला मिळतील याचा विश्वास आल्याचं सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.  दरम्यान सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्यात. 

Webtitle : congress president sonia gandhi will not be present for oath taking ceremony of uddhav thackeray 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress president sonia gandhi will not be present for oath taking ceremony of uddhav thackeray