

Congress Protest Over Education Department
ESakal
ठाणे : ठाणे काँग्रेसने शहरातील शैक्षणिक व्यवस्थेतील अनागोंदी विरोधात बुधवारी (ता. १२) पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन केले. यापूर्वी केलेल्या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने केवळ ‘कागदी घोडे’ नाचवत मराठी नामफलक आणि स्ट्रक्चरल ऑडिटबाबत आदेश दिले; मात्र त्यांची अंमलबजावणी न झाल्याने काँग्रेसने प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र टीका केली आहे. काँग्रेस शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या वेळी, ‘‘शिक्षण विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा’’ थेट इशारा दिला आहे.