पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कॉंग्रेसची रॅली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

भायखळा - इंधन दरवाढीविरोधात मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. 5) सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

भायखळा - इंधन दरवाढीविरोधात मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. 5) सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

महालक्ष्मी रेसकोर्स येथून सकाळी 11.30 वाजता रॅलीला सुरवात झाली. दुपारी गिरगाव चौपाटीवर रॅलीचा समारोप करण्यात आला. पेट्रोल- डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका मुंबईतील नागरिकांना बसत आहे. मुंबईकर देशात सर्वांत जास्त कर भरतात. या वेळी पेट्रोल- डिझेलचा जीएसटी करप्रणालीत अंतर्भाव करावा. पारदर्शकतेचा ठेका घेणारे हे सरकार पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर जीएसटी का लावत नाही, असा प्रश्‍न निरुपम यांनी केला. सरकार नागरिकांकडून उकळलेले पैसे जाहिरातींवर खर्च करून दिशाभूल करत असल्याची टीकाही निरुपम यांनी केली.

Web Title: Congress rally against petrol and diesel hike