राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडून रावसाहेब दानवे यांच्या टीकेचा समाचार

पूजा विचारे
Thursday, 8 October 2020

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. दानवेंच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्त्युत्तर दिलं. आता राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनंही दानवे यांच्यावर पलटवार केला आहे. 

मुंबईः भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर - अकबर - अँथोनीचे असल्याचे म्हटलं. महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील, असं म्हणत दानवेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला. दानवेंच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्त्युत्तर दिलं. आता राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनंही दानवे यांच्यावर पलटवार केला आहे. 

अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील, अशी टीका काँग्रेसनं रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे. 

दानवे यांच्या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, अमर, अकबर, अँथोनी' हा बॉलिवूडमधील एक गाजलेला चित्रपट आहे. यातील तिन्ही नायक हे वेगवेगळ्या परिस्थितीत वाढतात व कालांतरानं एकत्र येतात. हे तिघे मिळून शेवटी त्यांना दूर करणाऱ्या रॉबर्ट शेठचे मनसुबे उधळून लावतात. रॉबर्ट शेठ हा चित्रपटातील खलनायक आहे. तोच संदर्भ देत सावंत यांनी हे ट्वीट केलं आहे. 

या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी भाजप महाराष्ट्राला टॅग देखील केलं आहे. 

अनिल देशमुख यांची दानवेंवर टीका 

रावसाहेब दानवे म्हणाले महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि करोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून दानवेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले रावसाहेब दानवे

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे राज्यातले महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे. आम्हाला हे सरकार पाडायचे नाही. मात्र, तेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करणार, प्रश्न केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची विचारला आहे. या संदर्भात दानवे यांनी ट्वीट केलं आहे.

Congress Sachin Sawant criticism after anil deshmukh to Raosaheb Danve


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Sachin Sawant criticism after anil deshmukh to Raosaheb Danve