'कंगनाजी''ना काँग्रेसनं दिला 'हा' सल्ला, राम कदमांवर केली टिप्पणी

पूजा विचारे
Thursday, 3 September 2020

 राम कदम यांनी कंगना राणावत बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीयांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे, त्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. या भूमिकेवरुन काँग्रेसनं कंगनाला सल्ला दिला आहे. 

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेता कंगना राणावत नेहमी रोखठोक मत मांडत असते. मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असं कंगनानं मोठं विधान केलं होतं. भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिनं ही भूमिका घेतली होती.  राम कदम यांनी कंगना राणावत बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीयांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे, त्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. या भूमिकेवरुन काँग्रेसनं कंगनाला सल्ला दिला आहे. 

मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असं उत्तर कंगनानं राम कदम यांच्या मागणीवर दिलं होतं. हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी, पण मुंबई पोलिस नको प्लिज, असं कंगना म्हणाली होती. कंगनानं तात्काळ राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय देत त्यांचे आभार मानले होते.

 

मुंबई पोलिसांबद्दल व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसनं कंगनाला सल्ला दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.  कंगनाजी खरंतर तुम्ही ज्या व्यक्तीचे आभार मानले आहेत, त्याच्यापासूनच घाबरून राहायला हवं. मुलींसाठी ती फार धोकादायक आहे, असं सावंत यांनी म्हणत कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अधिक वाचाः  क्रॉफर्ड मार्केट दुर्घटनेतल्या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ, वाचा सविस्तर

काही वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवादरम्यान राम कदम यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र, आता सचिन सावंत यांनी पुन्हा त्याच प्रकरणाचा संदर्भ दिला आहे आणि  राम कदम यांच्यावर खोचक टिप्पणी ही केली आहे.

Congress Sachin sawant give advice kangana ranaut for bjp mla ram kadam


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Sachin sawant give advice kangana ranaut for bjp mla ram kadam