भाजपकडून फोडाफोडीचा घोडेबाजार, 'या' मोठ्या कॉंग्रेस नेत्याने केला आरोप

भाजपकडून फोडाफोडीचा घोडेबाजार, 'या' मोठ्या कॉंग्रेस नेत्याने केला आरोप

महाराष्ट्रात सत्ताबाजाराचा खेळ सुरु असताना आता महाशिव आघाडीतील तीनही पक्ष चांगलेच सतर्क झालेत. फोडाफोडीचा घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील ललित हॉटेलमध्ये, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना मुंबईतील रेनेसाॅं हॉटेलमध्ये तर कॉंग्रेसने आमदारांना जे डब्ल्यू मॅरीएट या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय.  

काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. जो नेता छातीठोकपणे आमचे आमदार फुटणार नाही असं वक्तव्य करत होता तोच फुटून भाजपसोबत गेल्याने गहजब माजला. यानंतर आता महाविकास आघाडीचे मोठे नेते आपापले पक्ष आणि आपापले आमदार यांना सांभाळताना पाहायला मिळतायत. 

अशातच आता कॉंग्रेच्या गोटातून अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येताना दिसतेय. भाजपकडून काही कॉंग्रेस आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांकडून केला जातोय.  काल महाराष्ट्रातील जनतेने राजकीय भूकंप अनुभवला. अशात आता भाजपला आपलं सरकार टिकवायचं असेल तर त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे भाजप आकड्यांची जमवाजमव करण्यासाठी भाजपकडून फोडाफोडी सुरवात काल रात्रीपासून झाली असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी  माध्यमांना दिली.  भाजप कडून आमदारांच्या खोल्यांमध्ये काही माणसं पाठवली जात आहेत. असा देखील आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय. 

दरम्यान, भाजपाच्या चार नेत्यांना ऑपरेशन लोटससाठी विशेष जबाबदारी दिल्याची माहिती सूत्राकडून समजतेय. यामध्ये नारायण राणे, गणेश नाईक, विखे पाटील, बबनराव पाचपुते यांची नावं पुढे येतायत. 

WebTitle : congress says bjp is doing horse trading

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com