कॉंग्रेस-शिवसेनेमध्ये "व्हॅलेंटाईन'- तावडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-शिवसेनेत "व्हॅलेंटाईन' साजरे झाले असून कॉंग्रेसने सुमारे चाळीस जागांची गिफ्ट शिवसेनेला दिली आहे, अशी टीका भाजपचे मंत्री विनोद तावडे यांनी आज "व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी केली.

दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात तावडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ते म्हणाले, की शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत दहा जागांवर कॉंग्रेसला मदत होईल, असे उमेदवार दिले आहेत, तर कॉंग्रेसने शिवसेनेला चाळीस जागांवर मदत होईल, असे उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी या दोन पक्षांनी एकमेकांना मदत होईल, अशी भूमिका घेतली असल्याची टीका तावडे यांनी या वेळी केली.

Web Title: Congress-Shiv Sena valentine's