Rahul Gandhi : राहूल गांधींसाठीच्या आंदोलनात कॉंग्रेसमध्ये दुफळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Supreme Leader Rahul Gandhi candidacy revoked Congress held big protest in Mumbai

Rahul Gandhi : राहूल गांधींसाठीच्या आंदोलनात कॉंग्रेसमध्ये दुफळी

मुंबई - कॉंग्रेसचे सर्वोच्च नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर मुंबईत कॉंग्रेसचे मोठे आंदोलन उभे राहिल, असे सर्वांना वाटले होते. मात्र कॉंग्रेसचे एकसंघ आंदोलन कुठे झाले नाही. आज आझाद मैदानात नाना पटोले आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर रमाबाई कॉंलनी येथे आंदोलने झाली.

मात्र त्यात कार्यकर्त्यांची उदासिनता दिसून आली. मागास आणि अल्पसंख्यांकांचा प्रतिसाद घटल्याचे या आंदोलनात दिसून आले. राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एससी ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

त्या आंदोलनात मागास आणि अल्पसंख्यांक घटकांचा अल्प सहभाग दिसून आला. त्यांचा प्रतिसाद घटत असल्याचे दिसून आले. अनुसुचित जाती, आदीवासी, इतर मागास आणि अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन झाले. त्या आंदोलनालाही मोठा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

कॉंग्रेस पक्षाचे विविध प्रकारचे ३९ सेल आहेत. त्या सेलचे स्वतंत्र अध्यक्ष आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर कारवाई झाली तरी मुंबई कॉंग्रेस पक्षाचे मुंबईत व्यापक आंदोलन झालेले नाही. आज मुंबईत पटोले आणि जगताप यांच्या नेतृत्वाखाली दोन ठिकाणी आंदोलने झाली. त्या आंदोलनात मागास आणि अल्पसंख्यांक घटकांचा सहभाग कमी होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये दुफळी असल्याची चर्चा कॉंग्रेसच्या वर्तूळात सुरू होती.

नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद उफाळून आला होता. दिल्लीच्या हायकमांडने निरीक्षक पाठवून पटोले आणि थोरात यांच्यात दिलजमाई घडवून आणली. मात्र कॉंग्रेसमध्ये अजूनही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या नेत्यांमधील वाद आणि नाराजीचा परिणाम आंदोलनावर होत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Rahul GandhiCongress