शिवशक्तीच्या संचलाक मंडळावर काँग्रेसचा एक हाती झेंडा

congress win shivshakti sugar factory director body election
congress win shivshakti sugar factory director body election

वाशी : येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्या नेतृत्वाखालील शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाच्या शिवशक्ती कारखाना बचाव पॅनलला दारूण पराभव स्वीकारावा लागला. वाशी (जि. उस्मानाबाद) येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली.

सोमवारी (ता.3) मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. 17 पैकी 16 जागा चेडे यांच्या शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीला मिळाल्या. या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पंडीतराव चेडे हे सोसायटी मतदारसंघातून आघाडीकडून बिनविरोध निवडून आले तर भाजपप्रणित पॅनलचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. सोमवारी झालेल्या मतमोजणीत शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीचे 15 उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने आपले उमेदवार उभे न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे व शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा मिळवण्यात काँग्रेस नेते प्रशांत चेडे यशस्वी झाल्यानतंर ही निवडणूक एकतर्फीच होणार असल्याची जोरदार चर्चा होती. सोमवारी मतमोजणीनतंर ती खरी ठरल्याचे दिसून आले. निवडणुक निकालानतंर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची मोठी उधळण करुन मोठा जल्लोष केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com