आमदारांच्या प्रयत्नांनी आदिवासी वसतीगृहाचे बांधकाम सुरू

zp-school.jpg
zp-school.jpg

भाईंदर : ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांची चांगली सोय व्हावी , त्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेल्या आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहाचे काम नुकतेच मीरा भाईंदरच्या हद्दीत सुरु झाले आहे. मुन्शी कंपाउंड येथे ह्या वस्तीगृहचे बांधकाम सुरु झाले आहे. हे काम झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने भव्य वास्तू शहरात उभी राहणार आहे.

कामाला सुधारित मान्यता देताना आणि त्याची निविदा प्रक्रिया करताना पहिल्या टप्प्यात पोचशे ऐवजी दोनशे विद्यार्थ्यांसाठी  वस्तीगृह बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता त्याचे काम सुरु झाले असून, नुकतेच मुन्शी कंपाउंड येथे आदिवासी  वस्तीगृहाचे बांधकाम सुरु झाले आहे. पुढील 18 महिन्यात आदिवासी  वस्तीगृह तेथे उभे राहणार आहे. 

पंचेचाळीस हजार स्केवर फूट एकूण क्षेत्राच्या भूखंडावर या वस्तीगृहाचे बांधकाम सुरु झाले असून तळ अधिक दोन मजले बांधकाम केले जाणार आहे. अडतीस हजार फूट बिल्टअप एरिया आहे. त्यात पहिल्या टप्प्यात दोनशे चार विद्यार्थी राहू शकतील इतकी सोय असणार आहे. सध्याच्या बांधकामाचा खर्च नऊ कोटी इतका आहे , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

येथेच दुसऱ्या टप्प्यात आणखी तीन मजले बांधून अधिकच्या तीनशए साठ विद्यार्थ्यांची सोय करण्याचेही मंजूर करण्यात आले आहे. एकूण या वस्तीगृह प्रकल्पासाठी वीस कोटी निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. म्हणजे एकूण पाचशे हुन अधिक विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वसतिगृहात होणार आहे असे सरनाईक यांनी सकाळशी बोलताना सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com