मेंढवण खिंडीत पुन्हा कंटेनर उलटला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंडीत उलटलेला कंटेनर.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंडीत उलटलेला कंटेनर.

कासा ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंडीत मंगळवारी (ता.१२) कंटेनर डिवायडरवर चढून उलटला. हा कंटेनर मुंबईकडे जात होता. तीव्र उतार व वळण असल्याने कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. 

यामध्ये वाहनचालक महंमद इब्राहिम हा गंभीर जखमी झाला असून त्याला कासा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातामुळे सुमारे तीन तास वाहतूक खोळंबल्याने कोंडी झाली होती.

चारोटी महामार्ग पोलिसांनी महामार्ग प्रशासनाची क्रेन आणून रस्त्याच्या मध्ये पडलेला कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. चारोटी महामार्ग पोलिस ठाणेप्रमुख विलास मतकर, कासा पोलिस कर्मचारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या महामार्गावर मेंढवण येथे नेहमीच अपघात होत असतात. यासाठी येथे काही वर्षांपूर्वी पोलिस चौकी, क्रेन आणि रुग्णवाहिका नेहमी उभी ठेवली जायची. 

आता ती सर्व उपाययोजना बंद आहे. मागे येथे झालेल्या अपघातांमध्ये खूप जणांचा बळी गेल्यानंतर काही काळ उपाययोजना करण्यात आली होती; मात्र पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची येथे संरक्षक पोलिस चौकी असावी, अशी मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com