दूषित पाण्याची आणखी कपात नाही 

रवींद्र खरात
गुरुवार, 25 एप्रिल 2019

कल्याण - पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले असले तरी विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली असून, यामुळे ठाण्यासह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आदी शहरांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

कल्याण - पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले असले तरी विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली असून, यामुळे ठाण्यासह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आदी शहरांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

उल्हास नदी पाण्याची पातळी खालावणे, नदीला जलपर्णीचा विळखा आदींबाबत "सकाळ'ने बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबत पाटबंधारे विभागाची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर संबंधित अधिकारी वर्गाने15 जुलै 2019 पर्यंत मुबलक पाणीसाठा असल्याची माहिती दिली. उल्हास नदीतून 130 दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी असून, तेवढा मुबलक साठा असल्याने आगामी काळात पाणीटंचाई भासणार नाही असा दावा या वेळी त्यांनी केला. 15 जुलै 2019 पर्यंत पाणीसाठा वापर व्हावा यासाठी प्रतिमहिना 30 तासांचे पाणी कपात करण्याबाबत संबंधित पालिका आणि अन्य संस्थांना आदेश दिले होते. त्यानुसार आजपर्यंत कपात करत पाटबंधारे विभागाला सहकार्य करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

उल्हास नदीमधील जलपर्णी विळखा वाढत असून, ती जलपर्णी काढण्यासाठी पाणी उचलत असलेल्या संस्थांनी पुढाकार घेत ती दूर करावी, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. आता पुन्हा अनेक पालिकेचे पत्र प्राप्त झाले असून, त्याचे उत्तर लवकरच दिले जाईल, अशी स्पष्ट भूमिका पाटबंधारे विभागाने केली आहे. 

दूषित पाण्याचा त्रास कायम 
दरम्यान, वर्षाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पाटबंधारे विभागाला सुमारे आठ कोटी रुपये देते. यामुळे जलपर्णीही पाटबंधारे विभागाने काढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते; मात्र पाटबंधारे विभागाने हात वरती केल्याने आता पालिका जलपर्णी काढते का? जर काढली तर पालिका आपल्या हद्दीत जलपर्णी काढेल; मात्र पुढील भागात कोण काढणार, असा सवाल उपस्थित होत आहे; मात्र आचारसंहिता असल्याने यावर तोडगा निघतो का, हाही सवाल केला जात असून, मे महिन्यात जलपर्णीमुळे उल्हास नदीमधून उचलणाऱ्या महानगरपालिकांना दूषित पाण्याचा त्रास चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे. 

Web Title: Contaminated water in ulhas river