साम टीव्हीवर आज रंगणार कवितेची मैफल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मराठी भाषा दिनानिमित्त खास कविसंमेलन
मुंबई - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस अर्थात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साम टीव्हीने उद्या, रविवारी ( ता. 26) कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून या कविसंमेलनाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. श्रीराम यात्रा कंपनी प्रा. लि. हे या कविसंमेलनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

मराठी भाषा दिनानिमित्त साम टीव्ही दोन वर्षांपासून कविसंमेलनाचे आयोजन करते आहे. यंदा या कविसंमेलनाचे तिसरे पर्व आहे. नव्या- जुन्या कवींच्या सर्वोत्तम आणि दर्जेदार कवितांचे सादरीकरण हे या कविसंमेलनाचे वैशिष्ट्य आहे. सलग दोन तास कवितेची मैफल दाखवणारी साम टीव्ही ही मराठीतील एकमेव वाहिनी ठरली आहे. ज्येष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळांकूरकर, मंगेश विश्वासराव या आधीच्या पिढीतील कवींसोबतच आजच्या पिढीतील तरुण कवी आबेद शेख, संदीप जगताप आणि राधिका फराटे हे या कविसंमेलनात सहभागी होत आहेत. या रंगतदार मैफलीचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी आणि साम टीव्हीचे वरिष्ठ निर्माता दुर्गेश सोनार यांनी केले आहे.

Web Title: Content to be played on TV today poetry concert