esakal | ठाणे महापालिकेला 'अल्टिमेटम' ५० टक्के बिले देण्याच्या मागणीवर ठेकेदार ठाम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे महापालिकेला 'अल्टिमेटम' ५० टक्के बिले देण्याच्या मागणीवर ठेकेदार ठाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : महापालिका (Municipal) क्षेत्रात विविध ठेकेदारांच्या माध्यमातून विकासकामे केली जातात; मात्र काम करूनही मागील दोन वर्षे त्यांची विलेच महापालिकेने अदा न केल्याने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली असून, ठेकेदारांनी साखळी उपोषणाचे हत्यारही उपसले आहे. त्यात आता पालिकेने २५ टक्के बिले देण्याची तयारी दर्शवल्याचे समोर आले आहे; मात्र किमान ५० टक्के बिले अदा करावीत, अशी मागणी करीत तसे न केल्यास शहराच्या विविध भागांत सुरू असलेली कामेही बंद करू, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.

ठेकेदारांची आजघडीला सुमारे ८०० कोटींची बिले थकीत असल्याची माहिती पालिकेने दिली. त्यामुळे थकीत विले मिळावी यासाठी ठेकेदारांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर मागील मंगळवारपासून साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज आठ दिवस पूर्ण झाले असूनही अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. त्यात महापालिकेने १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत केलेल्या कामांची बिले मागविली असून, त्याचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने २५ टक्के याप्रमाणे विले अदा करण्यात येतील, असे पालिकेने सांगितले आहे; मात्र असे असताना दुसरीकडे ठेकेदारांकडून ५० टक्के बिल अदा करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीचे पत्र नगर अभियंता अर्जुन अहिरे यांना दिले

हेही वाचा: Pimpri Update : शहरात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

विकासकामांना ब्रेक लागणार ?

कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. बिलांच्या प्रश्नाबाबत योग्य तोडगा न निघाल्यास शहरातील विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात प्रभागातील सुरू असलेली सर्व कामे बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला. यावर तोडगा न | निघाल्यास पालिका- ठेकेदारामधील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

loading image
go to top