‘त्या’ मुलाच्या  मृत्यूप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

मुंबई - चेंबूरमधील चित्ता कॅम्प येथील गटारात पडून अदिहान परवेझ तांबोळी (वय ३) याचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर ट्रॉम्बे पोलिसांनी हलगर्जीचा गुन्हा दाखल केला. तसेच पालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अदिहान मूळचा बीड येथील रहिवासी होता. काही महिन्यांपूर्वी तो चित्ता कॅम्प येथे आजोळी आला होता. गुरुवारी (ता. ७) मल्लीक ज्वेलर्सजवळील गटारात तो पडला. अग्निशमन दलाने त्याला बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची गंभीर दखल घेत ट्रॉम्बे पोलिसांनी कंत्राटदारावर हलगर्जीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: contractor is responsible for the death of the child

टॅग्स