उल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा

दिनेश गोगी
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

उल्हासनगरची स्थापना होण्यापूर्वी पासून शासनाच्या ताब्यात असलेल्या तीन प्रशस्त भूखंडांचा पाठपुरावा करून ताबा मिळवण्यात ओमी-पंचम यांना यश मिळाले आहे. त्यामुळे केबी महामार्गात बाधित झालेल्या शेकडी व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा, बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाचा व बोटक्लबच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

उल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर त्यांचे पुत्र युथ आयकॉन ओमी कलानी व महापौर पंचम कलानी यांनी पाऊल ठेवले आहे. उल्हासनगरची स्थापना होण्यापूर्वी पासून शासनाच्या ताब्यात असलेल्या तीन प्रशस्त भूखंडांचा पाठपुरावा करून ताबा मिळवण्यात ओमी-पंचम यांना यश मिळाले आहे. त्यामुळे केबी महामार्गात बाधित झालेल्या शेकडी व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा, बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाचा व बोटक्लबच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या ताब्यातील भूखंडाचा ताबा पालिकेला मिळवून दिल्याबद्दल ओमी कलानी-पंचम कलानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. 

बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल (पूर्वीचे व्हिटीसी ग्राऊंड), बोटक्लब, इंदिरा गांधी मार्केट हे तीन भूखंड उल्हासनगर पालिकेकडे असले तरी या भूखंडांचा ताबा राज्यशासनाच्या ताब्यात होते. त्यामुळे या भूखंडावर कोणतेही प्रशस्त बांधकाम किंबहूना डेव्हलपमेंट पालिकेला करता येत नव्हते. ही निकड गृहीत धरून आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी, युथ आयकॉन ओमी कलानी व अभ्यासू नगरसेवक राजेश वधारिया यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे पाठपुरावा केला. नार्वेकर यांनी गिरासे यांना सूचना दिल्यावर भूखंडांच्या ताब्याला गती मिळाली आणि या भुखंडांची रितसर सनद तयार करून जगतसिंग गिरासे यांनी या तिन्ही भूखंडांच्या ताब्याची सनद महापौर पंचम कलानी, ओमी कलानी, राजेश वधारिया यांच्या सुपूर्द केली.

हि आनंदाची माहिती महापौर पंचम कलानी यांच्या दालनात आयुक्त अच्युत हांगे, उपमहापौर जीवन इदनानी, ओमी कलानी आदींनी पत्रकारांशी शेअर केली. या भूखंडांपैकी इंदिरा गांधी मार्केटच्या भूखंडावर भव्य असे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून त्यामध्ये कल्याण अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणात दुकान पूर्णपणे बाधित झालेल्या व्यापाऱ्यांना दुकाने दिली जाणार आहेत. बाळासाहेब क्रीडा संकुलाला झळाळी देताना विविध खेळांचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे.बोटक्लबचा परिसर लाजवाब करताना त्यावरही डोळे दिपवून सोडणारे बांधकाम करण्यात येणार आहे. असल्याची माहिती महापौर पंचम ओमी कालानी,उपमहापौर जीवन इदनानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 

Web Title: The control of three government lands was given to Ulhasnagar Municipal Corporation