'त्या' जाहिरातीनंतर शिवप्रेमींकडून अक्षय कुमारची 'धुलाई'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. तत्याला कारण ठरतेय त्याने केलेली एक जाहिरात. अक्षय कुमारने एका जाहिरातीत छत्रपती  शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा पोशाख परिधान करून जाहिरात केल्याने आता नवीन वादाला  तोंड फुटलंय. अक्षय कुमार याने मावळ्यांचा पोशाख परिधान करून मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येतोय. 

काय आहे जाहिरात ?

या जाहिरातीमध्ये मावळे लढाईवरून परतलेले दाखवण्यात आले आहेत. यानंतर एक महिला मावळ्यांच्या मळलेल्या कपड्यांवर नाराजी नोंदवत हे कपडे आम्हालाच धुवायला लागणार असं म्हणताना दाखवली आहे. यावर अक्षय कुमार उत्तर देत म्हणातो की, "‘महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं, और अपने कपडे भी". यानंतर सर्व मावळे आपले मळलेले कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. 

सनसनी : पोलिस खुन्याच्या शोधात त्या ठिकाणी गेले पण..

वरळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल : 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीतील मावळे हे स्वराज्याचे शिलेदार होते. त्यांचे कपडे शत्रूच्या रक्ताने,स्वराज्याच्या निष्ठेने आणि शिवभक्तीने उजळले याला महाराष्ट्र साक्षीदार आहे . मात्र या जाहिरातीमधून तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशी तक्रात मुंबईतील वरळी पोलिस स्टेशनमध्ये दखल करण्यात आली आहे. 

No photo description available.

Image may contain: text

धक्कादायक - सांगली, कोल्हापूरनंतर आता हे शहर बुडणार!
 
पोलिसांमध्ये तक्रार दाखल करताना शिवप्रेमींनी या जाहिरातीची युट्युब वरील प्रत सीडीच्या माध्यमातून जमा केली आहे. दरम्यान सर्व माध्यमांनी तात्काळ या जाहिरातीचे प्रसारण बंद करण्याची मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येतेय. याचसोबत अभिनेता अक्षय कुमार आणि निरमाचं उत्पादन करणारी कंपनी आयुष लिमिटेडने देखील लवकरात लवकर माफी मागावी असं देखील आवाहन करण्यात येतंय. 

controversy after akshay kumars nirma ad complain given in worli police station mumbai

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversy after akshay kumars nirma ad complain given in worli police station mumbai