esakal | मुंबईसह राज्यात थंडीचा लपंडाव; रात्री हुडहुडी दिवसा घामाघूम
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईसह राज्यात थंडीचा लपंडाव; रात्री हुडहुडी दिवसा घामाघूम

मुंबईसह उपनगरात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागात किमान तापमान नोंदवले गेले.  सांताक्रूज, बोरिवली, कांदिवली, मुलूंडमध्ये किमान तापमान 20 अंशाच्या खाली घसरले आहे.

मुंबईसह राज्यात थंडीचा लपंडाव; रात्री हुडहुडी दिवसा घामाघूम

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईसह उपनगरात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागात किमान तापमान नोंदवले गेले.  सांताक्रूज, बोरिवली, कांदिवली, मुलूंडमध्ये किमान तापमान 20 अंशाच्या खाली घसरले आहे. पनवेलमध्ये देखील किमान तापमान 15 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे.  मुंबईत दिवसा कमाल तापमान 35 अंशाच्या दरम्यान नोंदवण्यात आले असून रात्रीचे किमान तापमान 19 अंशाखाली नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे दिवसा घामाघूम आणि रात्री हुडहुडी जाणवते आहे.
 
मुंबईसह राज्यातील काही भागात थंडीचं आगमन झालं आहे. मराठवावाडा , विदर्भातील काही भागात थंडीचा तीव्र प्रभाव जाणवतोय. या भागात सरासरीपेक्षा 5 ते 6 अंश तापमान खाली गेले आहे. पुढील 48 तास ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात रात्री किमान तापमानाची नोंद झाली असली तरी दिवसभर मात्र उन्हाचे चटके ही बसत आहेत.

अधिक वाचा-  दिवाळीत दोन जैन मंदिरे उघडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी
 

महाराष्ट्रात मंगळवारी सकाळी किमान तापमानाची नोंद झाली. परभणी मध्ये सर्वात कमी किमान 8.5 इतक्या तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर, यवतमाळ मधील पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. या भागात कडाक्याची थंडी जाणवतेय. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक थंडी जाणवत असून उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे वाहू लागल्यानंतर यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. 

राज्यातील शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई - 19.2

पुणे - 11.3

बारामती - 11.9

औरंगाबाद - 12.5

महाबळेश्वर - 13.6

नाशिक - 11.8

डहाणू - 19.8

जळगाव - 12.0 

कोल्हापूर - 16.0

सातारा - 12.8

सोलापूर - 13.0

चंद्रपूर - 8.6

परभणी - 8.5

यवतमाळ - 9.5

गोंदीया - 10.5

नागपूर - 11.5


------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

cool months begin Mumbai minimum temperature drops slightly says IMD

loading image
go to top