सहकार भारती दिल्ली गाठणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई - ग्रामीण भागात विकास सोसायट्या, दुग्धसंस्था, विणकर संस्था आणि शहरी भागात नागरी बॅंका व पतसंस्थांना पुरेशा प्रमाणात छोट्या मूल्यांच्या नोटा मिळाव्यात, या मागणीसाठी सहकार भारतीचे शिष्टमंडळ उद्या (ता. 21) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांना भेटणार आहे.

नोटाबंदी आणि नवीन नोटांचे वितरण या संदर्भात सहकारी बॅंकांना दुय्यम वागणूक मिळत आहे. या संदर्भात अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला स्पष्ट सूचना देणे आवश्‍यक असल्याचे सहकार भारतीचे सतीश मराठे यांनी सांगितले. सध्या सर्वच नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. देशात 50 हजारांहून अधिक वित्तीय सहकारी संस्थांचे जाळे आहे. त्यावर अवलंबून असलेल्या सभासद व खातेदारांची संख्या मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात विकास सोसायट्या तसेच शहरी भागात नागरी बॅंका व सहकारी पतसंस्थांनाही नवीन नोटांचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता व राष्ट्रीय महासचिव उदय जोशी करतील.

Web Title: cooperation recruitment