धक्कादायक ! अर्नाळा नगरपालिका देतेय बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

ठाणे - महाराष्ट्रात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मनसेने शोधकार्य राबवलंय. मुंबई, ठाणे, पुण्यातून अशा नागरिकांना मनसेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. अशातच १२ फेब्रुवारीनंतर मोठी शोधमोहीम राबवत मनसेने विरारच्या अर्नाळ्यातून २३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांच्या स्वाधीन केलेलं. यातल्याच दोन बांगलादेशी नागरिकांकडून धक्कादायक कागपत्र मिळाली आहेत. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही कागदपत्रं दुसरं तिसरं कुणी नाही तर अर्नाळा नगरपालिकेकडून देण्यात आलेली आहेत.

मोठी बातमी - बायकोला म्हणालेला "माझा फोन कुणी तरी ओढतंय ग", बास पोलिसांसाठी यावरूनच लावला छडा...

पोलिसांना अवैधरित्या राहणाऱ्या एकूण २३ नागरिकांपैकी दोन बांगलादेशी नागरिकांकडून अर्नाळा नगरपालिकेने दिलेली जन्म प्रमाणपत्र सापडली आहेत. पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक पथकाने कारवाई करत ही कागदपत्रं हस्तगत केली आहेत.  पोलिसांच्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या एकूण २३ जणांपैकी परविना गाजी आणि रफीकुल मेसार या दोघांकडून अर्नाळा नगरपालिकेने दिलेली जन्म प्रमाणपत्र हस्तगत करण्यात आलीत.

मोठी बातमी - डॉक्टरच म्हणतात "मिटिंगला पोहोचण्यासाठीचा उशीर टाळण्यासाठी ऍम्ब्युलन्सचा वापर"

यामध्ये ७ ऑगस्ट १९७५ अशी परविनाची जन्मतारीख नोंदवली आहे. याची नोंदणी १५ ऑगस्ट १९७५ रोजी याबाबत नोंदणी करण्यात आली आणि १६ जानेवारी २००८ रोजी हा जन्मदाखला देण्यात आलाय असं नमूद करण्यात आलं आहे. तर राफीकुलचा जन्म २० जून १९७३ रोजी झाला, ज्याची नोंदणी २५ ऑगस्ट १९७३ रोजी करण्यात आली आणि २९ जानेवारी २००७ मध्ये हा जन्माचा दाखला देण्यात आला अशी नोंदणी आहे. या दोन्ही जन्म दाखल्यांचा नोंदणी क्रमांक अनुक्रमे ०१ आणि ११ असा आहे.  

cops found birth certificates from two illegal immigrants of virar palghat

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cops found birth certificates from two illegal immigrants of virar palghat