सलग चौथ्या दिवशी कोथिंबीर 100 रुपयेच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

आलं 40 रुपये पाव
कोथिंबीर बरोबर आल्याचे ही भाव वाढले आहे. घाऊक बाजारात सुकं (न भिजलेले) 40 रुपये पाव किलो तर अर्धा 70 रुपये किलोने विकले जात आहे. पाऊसमुळे आलं ही भिजते.ते ही जास्त काळ टिकत नाही. म्हणून भाव वाढले आहे.

मुंबई : गेले चार दिवस घाऊक आणि किरकोळ बाजरात कोथिंबीरिनी शंभरी गाठली आहे. आज ही बाजारात कोथिंबीरचा भाव 100 रुपयेच आहे. 

राज्यभरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाजीपाला भिजतो. भिजलेला माल जास्त काळ राहू शकत नाही. कोथिंबीर भिजलेली अजिबात जास्त काळ टिकत नाही त्यामुळे कोथिंबीर महाग झाली आहे, अशी माहिती प्लाझा भाजी मार्केट मधील विक्रेत्यांनी दिली.

नाशिक येथून कोथिंबीर बाजारात येते. मोठी जुडी 100 रुपयेला घाऊक बाजारात मिळते. पण किरकोळ बाजारात याच जुडीची अर्धी जुडी 100 रुपयांना आहे. तर 50 रुपयाला एका वापरा पुरता जुडी मिळते. त्यामुळे गृहिणींनी रोजच्या जेवणात कोथिंबीर वापरणे बंदच केली आहे. यर पोळी भाजी केंद्रात कोथिंबीर वडी गायब झाली तर इतर पदार्थात तिचा वापर ही कमी झाला आहे. 

आलं 40 रुपये पाव
कोथिंबीर बरोबर आल्याचे ही भाव वाढले आहे. घाऊक बाजारात सुकं (न भिजलेले) 40 रुपये पाव किलो तर अर्धा 70 रुपये किलोने विकले जात आहे. पाऊसमुळे आलं ही भिजते.ते ही जास्त काळ टिकत नाही. म्हणून भाव वाढले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coriander rate hikes in Mumbai