चांगली बातमी; 50 टक्के बालकांमध्ये कोविडविरोधी प्रतिपिंडे

Corona-antibody
Corona-antibodysakal media

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) बालकांसाठी धोकादायक असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून ( Scientist) दिला जात आहे. मात्र, धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुंबईसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेने (BMC) केलेल्या सेरो सर्वेक्षणात 50 टक्के बालकांमध्ये कोविडविरोधातील प्रतिपिंडे (Corona Antibodies) आढळली आहे. त्यामुळे, या बालकांना कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या संसर्गपासून बचाव होण्यास मदत होणार आहे. ( Corona Antibodies helps children not infection in Covid third wave )

मागील दीड दोन वर्षांपासून झालेल्या कोरोनाच्या संसर्गात लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, पालिकेच्या सेरो सर्वेक्षणात आढळलेल्या निष्कर्षानुसार, तिसऱ्या लाटेत बालकांना बाधा झाली तरी त्यांच्यातील लक्षण सौम्य असू शकतील. याशिवाय त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असेल किंवा त्यांना बाधा होण्याची शक्यताही कमी असेल,असे पालिकेतील अभ्यासक सांगतात.

Corona-antibody
कोरोनाच्या म्युटेड होणाऱ्या व्हायरसवर तात्याराव लहाने म्हणाले...

पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या सेरो सर्वेक्षणामुळे बालकांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिपिंडे तयार झाली असल्याचे आढळली आहे. त्यामुळे, तिसऱ्या लाटेत याचा फायदा होईल. मुंबई महापालिकेच्या तिस-या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मुंबईतील 24 वॉर्डमध्ये मे आणि जून महिन्यात 6 ते 18 वयोगटांतील लहान मुलांचा सेरो सर्व्हे केला होता. त्यानुसार, सेरो सर्व्हेमध्ये जवळपास 50 टक्के लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत अँटीबॉडीज असलेल्या लहान मुलांची संख्यादेखील जास्त आढळली असूनही बाब समाधानकारक मानली जात आहे.

पालिकेच्या नायर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीव वैद्यकीय निदान प्रयोगशाळा यांनी संयुक्तपणे रक्त नमुने विषयक सेरोलॉजिकल सर्वेक्षण राबवले. वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चाचणी करण्यासाठी संपूर्ण मुंबईतून आलेल्या रक्त नमुन्यांमधून विभागनिहाय नमुने घेऊन हे सर्वेक्षण केले गेले.

प्रयोगशाळांमधील नमुन्यांवर चाचण्या -

या सेरो सर्व्हेसाठी 24 प्रशासकीय विभाग मिळून एकूण 2,176 अनोळखी रक्त नमुने वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले होते. महापालिकेच्या अंतिम निकषांनुसार, मुंबईतील 51.18 टक्के बालकांमध्ये अँटीबॉडीज आढळली आहेत. त्यापैकी महापालिकेच्या प्रयोगशाळेतील 54. 36 टक्के तर खासगी प्रयोगशाळेतील 47.03 टक्के नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. 1 ते 4 वयोगटामध्ये 51.04 टक्के, 5 ते 9 वयोगाटामध्ये 47.33 टक्के, 10 ते 14 वयोगटामध्ये 53.43 टक्के , 15 ते 18 वयोगटामध्ये 51.39 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत.

Corona-antibody
अन् उद्धव ठाकरे उत्तर न देताच निघून गेले...

1 ते 18 वर्षापेक्षा कमी या वयोगटात सरासरी 51.18 टक्के होती. विशेष म्हणजे यापूर्वी म्हणजे मार्च 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात 18 पेक्षा कमी असलेल्या वयोगटात आढळलेल्या प्रतिजेविकांचा विचार केल्यास सुमारे 39.04 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले होते. त्या तुलेनत आता अँटीबॉडीज आढळलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. याचा अर्थ मुंबईतील 50 टक्के लहान मुले कोरोनाच्या विळख्यात आली होती पण, त्यांच्यात असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्यांना कोरोनाची जास्त गंभीर लक्षणे आढळली नाहीत. किंवा त्यातील बऱ्याच मुलांना त्यांना कोरोना झाला होता याबाबतची ही माहिती नव्हती.

तिसऱ्या लाटेसाठी पालिका सज्ज

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज असून लहान मुलांच्या उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या उपचारांसाठी लागणारे बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आणि आयसीयूची सुविधा केली जात आहे. भविष्यात कुठल्याही आपातकालीन परिस्थितीला सामोर जावे लागू नये यासाठी पालिका तयार आहे असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com