कोरोना गावांच्या वेशीपाशी अन् उरण बाजारपेठेत चक्काजाम

शनिवार, 27 जून 2020

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अधिक प्रमाणात वाढत असताना उरण शहरातील बाजारपेठेत दररोज लहान-सहान वाहने आणि नागरिकांचा चक्काजाम होत आहे.

उरण : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अधिक प्रमाणात वाढत असताना उरण शहरातील बाजारपेठेत दररोज लहान-सहान वाहने आणि नागरिकांचा चक्काजाम होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याच्या मार्गावर असताना या गर्दीमुळे तालुक्यातील गावोगावी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

हेही वाचा: मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

याचे गांभीर्य घेत नसलेले नागरिक व महिला उरण तालुका जणू काही कोरोनामुक्तच झालाय, असे गृहीत धरून सुरक्षित अंतराचा फज्जा उडवत कोणत्या ना कोणत्या कामाचे निमित्त घेऊन बाजारपेठेत प्रचंड गर्दी करीत आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिस, महसूल आणि अन्य प्रशासनही कोरोनाच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मागील तीन महिने अहोरात्र झटत होते. आजही प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच आहे; मात्र कोणत्याही प्रकारे सोयरसुतक नसलेल्या बेफीकीर नागरिकांना आवरणे आत्ता मुश्कील झाले आहे.

मोठी बातमी मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..

नागरिकांच्या सुरक्षेसाठी कित्येक दिवस राबणाऱ्या पोलिस, महसूल, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष न देता समाजातील नागरिकांसाठी आपले कर्तव्य बजावण्याचे काम चोखपणे करीत आहेत; मात्र मोकाट फिरणाऱ्या नागरिकांनी त्याची कदर आजपर्यंत केलीच नाही. सर्व सुविधा वेळेतच मिळाल्या पाहिजे त्यासाठी कोणत्याही वेळी घराबाहेर पडून, बाजारपेठेत गर्दी करायची यापेक्षा गांभीर्याने घेणाऱ्यांची संख्या फार कमी असून, काही नागरिक मास्कही वापरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना काही दिवसांतच कोरोना प्रत्येक गावाच्या वेशीपर्यंत पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

corona can be inter in market but in uran village nobody will take it seriously