रायगड जिल्हा परिषदेत कोरोनाचा धुडगूस; अँटिजेन तपासणीत 'इतक्या' जणांना लागण झाल्याचे उघड

महेंद्र दुसार | Friday, 7 August 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी कार्यालयात अँटिजेन तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्हा परिषदेतील 231 कर्मचाऱ्यांची गुरुवारी (ता. 7) अँटिजेन तपासणी झाली. त्यात सात जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात आले.

 

अलिबाग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी कार्यालयात अँटिजेन तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्हा परिषदेतील 231 कर्मचाऱ्यांची गुरुवारी (ता. 7) अँटिजेन तपासणी झाली. त्यात सात जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात आले.

खोपोलीच्या कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरच बेपत्ता; पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष; रुग्णांना होताहेत अतोनात हाल 

जिल्ह्यामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच जिल्हा परिषद या शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. यासाठी येथील कर्मचाऱ्यांची अँटिजेन तपासणी करण्याची मोहीम प्रशासनामार्फत सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून अलिबाग तहसील कार्यालयामार्फत ही तपासणी करण्यात आली आहे. 

रेल्वेमध्ये वकिलांना प्रवेश नाहीच! राज्य सरकारने मागणी फेटाळली

जिल्हा परिषद कार्यालयात गुरुवारी (ता. 6) 231 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सात कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासनातील तीन, आरोग्य विभागातील एक व शिक्षण विभागातील तिघांचा समावेश आहे. यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

 

जिल्हा परिषदेतील सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्स राखत काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांची तपासणी केली जात आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी
 रायगड जिल्हा परिषद

 

सर्व कार्यालयांत अँटिजेन तपासणी
ग्रामपंचायत, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती आदी रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अँटिजेन तपासणी करण्यात येत आहे. कोरोना रोखण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी तपासणी कीट उपलब्ध असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )