esakal | मुंबईत कोरोनाचा डाऊनफॉल
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईत कोरोनाचा डाऊनफॉल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा डाऊनफॉल (Downfall) स्पष्टपणे दिसत आहे. 1 जून (June) ते 30 ऑगस्ट (August) दरम्यान कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्णांमध्ये 46 टक्के आणि मृत्यूच्या (Death) आकडेवारीत 87 टक्के घट (Less) नोंदवण्यात आली आहे. तज्ञांच्या मते, कोरोनाची (Corona) दुसरी लाट संपुष्टात आली आहे, अशा परिस्थितीत नवीन रुग्णांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. रुग्ण कमी असतील तर मृत्यूंची संख्याही कमीच असेल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. महानगरपालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात मुंबईत 16,934 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर ऑगस्ट महिन्यात 9048 नवीन कोरोना रुग्ण आढळले. या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या रुग्णांमध्ये 46.57 टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर जून महिन्यात कोरोनामुळे 625 लोकांचा मृत्यू झाला आणि ऑगस्टमध्ये केवळ 78 मृत्यूंची नोंद झाली आहे. म्हणजेच, मृत्यूच्या संख्येत 87.58 टक्के घट झाली आहे.

कोविड मृत्यू निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.अविनाश सुपे यांनी सांगितले की, मुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसते. जूनच्या तुलनेत ऑगस्टमध्ये नवीन रुग्णांमधये घट झाली आहे. या महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. एकूणच परिस्थिती नियंत्रणात आहे.

हेही वाचा: संजू सॅमसन यो यो चाचणीत नापास 

चाचणी, ट्रेसिंग आणि उपचारांवर भर -

योजनेनुसार चाचणी, ट्रेसिंग आणि उपचारांवर अधिक भर देत दिला गेला आहे. म्हणूनच, संसर्गाची गती मोठ्या प्रमाणावर नियंत्रित झाली आहे, मात्र, आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे, नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

डॉ. दक्षा शहा, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

----------------------------------------------------------------------------------------

उत्सवात प्रवास आणि गर्दी करू नका -

आता मुंबईकरांनी संयमाने वागण्याची गरज आहे.  एकापाठोपाठ एक सण येत आहेत, अशा स्थितीत लोकांनी एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी, गाव, शहरे अशा ठिकाणी प्रवास करणे टाळावे. त्यासोबतच गर्दी टाळावी.  हे पाळले नाही तर तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागू शकते.

डॉ. अविनाश सुपे, अध्यक्ष, कोविड मृत्यू निरीक्षण समिती

------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्यात 50 टक्के केसेस आणि 83 टक्के मृत्यूंमध्ये घट -

1 जून ते 30 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांमध्ये 50.75 टक्के घट झाली आहे. जूनमध्ये 3,14,000 नवीन कोरोना रुग्ण सापडले तर ऑगस्टच्या अखेरीस 1,54,682 नवीन कोरोना रुग्ण सापडले. जूनमध्ये कोरोनामुळे 26,601 लोकांनी आपला जीव गमावला, तर ऑगस्ट महिन्यात 4,365 लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच, मृतांच्या संख्येत 83.59 टक्के घट नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा: दारु मिळाली नाही म्हणून पिलं सॅनिटायझर; 9 लोकांचा मृत्यू

  • मुंबईची आकडेवारी

महिना रुग्ण मृत्यू

जून 16934 625

जुलै 12557 438

ऑगस्ट 9048 78

  • राज्याची आकडेवारी

महिना रुग्ण मृत्यू

जून 3,14,000 26,601

जुलै 2,33,595 10,846

ऑगस्ट 1,54, 682 4,365

loading image
go to top