'जेएनपीटी'लाही कोरोनाचा फटका, व्यवसायात तब्बल 'इतकी' घट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जेएनपीटीसह त्यावर आधारित गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया, एनएसआयसीटी, एनएसआयजीटी आणि भारत मुंबई कंटेनर टर्मिनल यांनी एप्रिल 2019 च्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये सुमारे 1 लाख 64 हजार 484 कंटेनर हाताळणी गमावली आहे.

उरण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरणमधील  जेएनपीटी बंदराच्या व्यवसायात मोठी घसरण झाली आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये बंदराचा एप्रिल आणि मे महिन्यात निम्म्याने व्यवसाय कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत जेएनपीटी व त्यावर आधारित इतर सर्व बंदरांनी मिळून सुमारे साडेतीन लाख कंटेनर हाताळणी कमी केल्याची माहिती समोर आली आहे.

BIG NEWS  - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जेएनपीटीसह त्यावर आधारित गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया, एनएसआयसीटी, एनएसआयजीटी आणि भारत मुंबई कंटेनर टर्मिनल यांनी एप्रिल 2019 च्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये सुमारे 1 लाख 64 हजार 484 कंटेनर हाताळणी गमावली आहे. तर मे महिन्यात या सर्व बंदरांनी मिळून सुमारे 1 लाख 74 हजार 162 कंटेनर कमी हाताळल्याचे बंदराच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

जेएनपीटीमध्ये गेल्या वर्षी एप्रिल 2019 मध्ये या पाचही बंदरांमध्ये आयात निर्यातीच्या निमित्ताने एकूण 147 तर मे महिन्यात एकूण 152 देशी-विदेशी जहाजे येऊन गेली आहेत. तर यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात 113 तर मे महिन्यात 124 देशी-विदेशी जहाजे येऊन गेली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यात एकूण 62 जहाज कमी आल्याने जेएनपीटीच्या व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला आहे. यावर्षी 3 लाख 38 हजार 646 कंटेनर हाताळणी कमी झाली आहे.

नक्की वाचा तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

दृष्टीक्षेप -

  • एप्रिल 2019 मध्ये हाताळलेले कंटेनर संख्या :  4 लाख 48 हजार 286 
  • एप्रिल 2020 मध्ये  हाताळलेले कंटेनर संख्या : 2 लाख 83 हजार 802 
  • मे 2019 मध्ये हाताळलेले कंटेनर संख्या : 4 लाख 48 हजार 919 
  • मे 2020 मध्ये हाताळलेले कंटेनर संख्या : 2 लाख 74 हजार 755 
  • एप्रिल व मे महिन्याची एकूण घट
  • 3 लाख 38 हजार 646 कंटेनर

Corona effect on JNPT, halves business read detail story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect on JNPT, halves business read detail story