या कारणामुळे अवयव दानात घट

या कारणामुळे अवयव दानात घट

मुंबई ः कोरोना महामारीमुळे भविष्यात अनेक प्रश्न गंभीर होणार अशीच चिन्हे दिसत आहेत. या महामारीमुळे अवयवदानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत मार्च ते जुलै दरम्यान ही घट तब्बल 70 टक्क्यांची आहे.

झोनल ट्रान्सप्लँट को-ऑर्डिनेशन कमिटीने अवयव दान शिबिराचे आयोजन केले होते. मार्च ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत अवयव दानासाठी दहा शव देण्यात आले. त्याचा फायदा 29 जणांना झाला. त्यामुळे 14 जणांना किडनी, दहा जणांना यकृत, दोघांना स्वादुपिंड, एकास हृदय देण्यात आले. सध्या 3 हजर 536 व्यक्ती किडनीच्या, 350 व्यक्ती यकृताच्या, 27 जण हृदयाच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचबरोबर 14 जणांना फुफ्फुसाची, 10 जणांना स्वादुपिंडाची तर तिघांना हाताची गरज आहे. 

हे वाचा : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार

अवयव दानाची मुंबईत कायम गरज असते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदाची घट खूप मोठी आहे. गतवर्षी मार्च ते जुलै या कालावधीत 33 शव अवयव दानासाठी आली होती. त्याचा फायदा 105 रुग्णांना झाला होता. 59 किडनी, 28 यकृत, 12 हृदय आणि सहा फुफ्फुसे त्यांना एकत्रितपणे देण्यात आली होती. मार्चपासून मुंबईत प्रत्येक महिन्याला सरासरी दोनच शव अवयव दानासाठी येत आहेत, तर त्यापूर्वी महिन्याला हेच प्रमाण सात होते. 

रुग्णालयात कोरोना व्यतिरीक्त रुग्णांसाठीच्या अती दक्षता विभागात घट झाली आहे. त्यामुळे अवयव दानाचे प्रमाणही घटले आहे. त्याचबरोबर अपघात कमी झाल्याने अवयव दान करणाऱ्या व्यक्तीही कमी आहेत. अनेकदा ब्रेन डेड रुग्णांचे नातेवाईक अवयवदान करतात, पण सध्या ते रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. 

शहरातील अनेक सर्जन सध्या अवयव दानास तयार होत नाहीत. मृत व्यक्ती कोरोना बाधित असल्यास त्याचा प्रतिकुल परिणाम अवयव देण्यात येणाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीवर होऊ शकेल. आता डॉक्टरही यकृत मोठ्या प्रमाणावर खराब असलेल्या व्यक्तींसाठीच अवयव रोपण करीत आहेत. किडनी तसेच हृदयाच्या रुग्णांसाठीचे अवयव रोपण लांबवण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबईत 38 रुग्णालयात अवयव दान तसेच अवयव रोपण केले जाते, त्यापैकी 13 रुग्णालयांनी कोरोना कालावधीत या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे, तर आठ रुग्णालयांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com