कोविड केंद्रातील यंत्रणेचा टीबी रुग्णालयात वापर | corona center update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 corona center

कोविड केंद्रातील यंत्रणेचा टीबी रुग्णालयात वापर

मुंबई : कोविड संसर्ग (corona infection) नियंत्रणात आल्याने अनेक छोटी कोरोना केंद्र (small corona center) बंद करण्यात येत आहेत. दादर येथील कोविड एचडीयू रुग्णालयातील (corona HDU hospital) सर्व यंत्रणा शिवडी येथील क्षय रुग्णालयात (Sewri tuberculosis hospital) नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या यंत्रणेचा वापर नवीन मध्यवर्ती श्वसन उपचार केंद्रासाठी (Breathing treatment center) करण्यात येणार आहे. सदर यंत्रणा उभारण्यासाठी सिनेअभिनेता अजय देवगणसह (Ajay devgan) इतर निर्मात्यांनी १ कोटी १० लाख रुपयांची मदत केली होती. आता याच वैद्यकीय यंत्रणेच्या साह्याने क्षयरुग्णांवर अधिक प्रभावीपणे मोफत उपचार होण्यास मदत होईल, असे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (kiran Dighavkar) यांनी सांगितले.

हेही वाचा: माणुसकी जपणाऱ्या माणसाचं गोंदण: ऑल इज वेल

कोविड विषाणूबाधित रुग्णांवर उपचारांसाठी दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये महापालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाने २५ रुग्‍णशय्या क्षमतेचे 'कोविड एचडीयू' (हाय ड‍िपेन्‍डन्‍सी युनिट) रुग्‍णालय उभारले होते. या रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापन हिंदुजा रुग्‍णालयाकडून करण्यात येत होते.

एनवाय फाऊंडेशन आणि इतर बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने दादर येथे कोविड एचडीयू रुग्णालय उभारण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक सामग्री दान करण्यात आली होती. दान केलेली सर्व वैद्यकीय यंत्रणा आता शिवडी क्षय रुग्णालयात नवीन मध्यवर्ती श्वसन उपचार केंद्र उभारण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, असे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

loading image
go to top