esakal | सप्टेंबरमध्ये पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; अवघ्या 21 दिवसांत 66 जणांचा मृत्यू  
sakal

बोलून बातमी शोधा

सप्टेंबरमध्ये पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; अवघ्या 21 दिवसांत 66 जणांचा मृत्यू  

सप्टेंबरच्या 21 दिवसांत 66 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका महिन्यात पोलिस दलातील कोरोना मृ्त्यूंचा हा आतापर्यंतचा हा उच्चांक असून  दलातील कोरोनाची वाढती संख्याचिंतेचा विषय ठरत आहे.

सप्टेंबरमध्ये पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; अवघ्या 21 दिवसांत 66 जणांचा मृत्यू  

sakal_logo
By
अनिश पाटील


मुंबई - सप्टेंबरच्या 21 दिवसांत 66 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका महिन्यात पोलिस दलातील कोरोना मृ्त्यूंचा हा आतापर्यंतचा हा उच्चांक असून  दलातील कोरोनाची वाढती संख्याचिंतेचा विषय ठरत आहे.

मराठा आरक्षणात केंद्राने व भाजपने कुंपणावर बसू नये; विरोधकांच्या भूमिकेत राजकारणाचा वास असल्याची अरविंद सावंत यांची टीका

गेल्या 24 तासांत राज्यात पाच पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 222 वर पोहोचला आहे. हा महिना संपाण्यास नऊ दिवस शिल्लक असताना यापूर्वीचा कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांचा संख्येपेक्षा सप्टेंबर महिन्यात उच्चांक गाठला आहे. या महिन्यात आतापर्यंत 66 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सरासरी 3 पेक्षा जास्त पोलिसांना दरदिवशी मृत्यू होत आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात राज्यात 54, जुलैमध्ये 43, जूनमध्ये 33, मे मध्ये 23 तर एप्रिलमध्ये 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

24 तासांत 159 जणांना संसर्ग
गेल्या 24 तासांत राज्यात 159 पोलिसांना कोरानाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या पोलिसांची संख्या 21 हजार 311 वर पोहोचला आहे. त्यातील तीन हजार 655 पोलिस सध्या सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवार व रविवार या 24 तासांत राज्यात ठाणे शहर, नाशिक ग्रामीण, भंडारा,सोलापूर ग्रामीण व गोंदीया येथील पाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

ग्रामीण भागात शिरकाव
मुंबई, ठाणे व पुणे पोलिसांमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक असताना जुलै महिन्यापासून राज्यातील ग्रामीण भागातील पोलिसांमध्येही कोरोनाचा मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला. राज्यातील ग्रामीण विभागातील पोलिसांमध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू चितेंचे विषय ठरत आहे. बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांतही ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू झाले. आता भंडारा, गोंदिया, सोलापूर ग्रामीण येथील पोलिसांचेही कोरोनामुळे मृत्यू ही बाब राज्य पोलिस दलासाठी चिंतेची आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध तुकड्यांमध्येही ऑगस्ट महिन्यात पोलिसांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top