मुंबईत कोरोनाचे थैमान थांबेना! गेल्या 24 तासात 2 हजारापेक्षा अधिक रुग्णांची भर; तर 44 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचे थैमान थांबेना! गेल्या 24 तासात 2 हजारापेक्षा अधिक रुग्णांची भर; तर 44 जणांचा मृत्यू

मुंबईत आज 2 हजार 282 रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णसंख्या 1 हजार 96 हजार 459 झाली. रूग्णवाढीचा दर 1.14 टक्क्यांवरून कमी होऊन 1.07 वर खाली आला आहे.

मुंबईत कोरोनाचे थैमान थांबेना! गेल्या 24 तासात 2 हजारापेक्षा अधिक रुग्णांची भर; तर 44 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

 

मुंबई : मुंबईत आज 2 हजार 282 रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णसंख्या 1 हजार 96 हजार 459 झाली. रूग्णवाढीचा दर 1.14 टक्क्यांवरून कमी होऊन 1.07 वर खाली आला आहे. दिवसभरात 1 हजार 942 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका झाला  आहे.   

अंतिम सत्राच्या परीक्षा अडचणीत; मुंबई विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन  

मुंबईत आज नोंद झालेल्या 44 मृत्यूंपैकी 29 जणांना दीर्घकालीन आजार होते.  एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 27 पुरुष तर 17 महिलांचा समावेश होता.  मृत 44 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते.18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते, तर 24 रुग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक होते.                
 दिवसभरात 1 हजार 942 रुग्ण बरे झाले आहेत. आज पर्यंत 1 लाख 58 हजार 749 रुग्णांना घरी सोडण्यात आले.  रुग्ण दुपटीचा दर वाढून 65 दिवसांवर गेला आहे. तर 25 सप्टेंबर पर्यंत  10 लाख 70 हजार 623 चाचण्या करण्यात आल्या. तर 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान  रुग्णवाढीचा दर 1.07  इतका आहे. 

उत्तर अरबी समुद्रात जपान-भारत नौदल कवायती; सहकार्य वाढवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम 
 

671 इमारती आणि झोपडपट्टया प्रतिबंधित   
मुंबईत 671 इमारती आणि झोपडपट्टया प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 10 हजार 694 असून गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 15 हजार 3 अति जोखमीचे रुग्ण आहेत. तर 2 हजार 82 रुग्ण कोव्हिड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top