navi-mumbai-municipal
navi-mumbai-municipalsakal media

नवी मुंबई : उद्यापासून घणसोलीचे सेंट्रल पार्क खुले होणार

सकाळ'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

नवी मुंबई : कोविडच्या साथीमुळे (corona pandemic) गेले दीड वर्षे बंद असलेले घणसोलीतील (Ghansoli) सेंट्रल पार्क (central park opens) अखेर खुले होणार आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी घणसोलीचे सेंट्रल पार्क उद्यापासून (ता. २२) सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली आहे. 'सकाळ'ने याबाबत बातमी (Sakal News) प्रकाशित करून सेंट्रल पार्कचा मुद्दा प्रकाशात आणला होता. अखेर महापालिकेतर्फे त्याची दखल घेऊन प्रशासनाने ते खुले करण्याचे आदेश दिले आहेत.

navi-mumbai-municipal
सरकारने बूस्टर डोस सुरू करावा; महिला आरोग्य कर्मचाऱ्याची मागणी

घणसोली सेक्टर ३ येथे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून २०१९ मध्येच सेंट्रल पार्क तयार केले आहे. या उद्यानात विविध प्रकारच्या साहित्यांसह आकर्षित सजावट करण्यात आली आहे. या ठिकाणी स्थानिकांसाठी विरंगुळ्याचे केंद्रही आहे. तत्कालिन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते मार्च २०२० या उद्यानाचे उद्‍घाटन झाले होते; परंतु उद्‍घाटन झाल्यापासून काही दिवसांतच केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी लागू केल्याने उद्यानाचा आनंद नागरिकांसाठी औटघटकेचा ठरला. तेव्हापासून गेले दीड वर्षे हे उद्यान तयार असूनही निर्बंधांमुळे बंद होते. चांगले व अद्ययावत उद्यान असूनही नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नव्हता. अखेर याबाबत 'सकाळ'ने बातमी प्रकाशित करून नागरिक सुविधांपासून वंचित राहत असल्याची बाब समोर आणली.

कोरोना कमी होत असल्यामुळे शहरातील इतर सेवा सुरळीत होत असताना सेंट्रल पार्कही सुरू करण्याचा मुद्दा सकाळने लावून धरला होता. त्याची दखल घेत आज महापालिकेतर्फे हे उद्यान सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सकाळी ५.३० ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत उद्यान खुले करण्यात येत आहे.

त्रिसूत्रीचे पालन आवश्‍यक

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला, तरी कोरोना संपलेला नाही. याची जाणीव ठेवून नागरिक / मुलांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. 'नो मास्क-नो एन्ट्री' हे तत्त्व उद्यान प्रवेशासाठीही लागू असून, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि कोविडच्या सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com