रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन कोरोना रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमोल सांबरे
Sunday, 6 September 2020

कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्याला पुन्हा रुग्णालयात आणून तातडीचे उपचार सुरू केले. डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यात राहणाऱ्या एका अत्यवस्थ रुग्णाने विक्रमगडमधील रिव्हेरा समर्पित कोरोना उपचार रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रुग्णाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

नक्की वाचा : 'खाकी'ने दाखवली भूतदया; पोलिसानी दिले अशक्त पक्ष्याला जीवदान

वाड्यातील एका 38 वर्षीय कोरोना रुग्णावर पोशेरी केंद्रात उपचार सुरू होते; मात्र अत्यवस्थ झाल्याने त्याला शनिवारी रात्री विक्रमगडमधील रिव्हेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी लघुशंकेला जात असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगून तो स्वच्छतागृहाकडे न जाता थेट रुग्णालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर गेला. तिथून त्याने रुग्णालयाच्या मागच्या बाजूला उडी घेतली. 

हे ही वाचा : 'मातोश्री'वर आलेल्या दुबईच्या कॉल बाबत अनिल परब यांचे स्पष्टीकरण; वाचा काय म्हटले?

कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्याला पुन्हा रुग्णालयात आणून तातडीचे उपचार सुरू केले. डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. अधिक उपचारांसाठी त्याला मुंबईत हलविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

(संपादन : वैभव गाटे)

Corona patient jumping from the roof of hospital in vikramgad mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient jumping from the roof of hospital in vikramgad mumbai