मुंबईत कोरोना रुग्णसंख्या 90 हजार पार; आज 'इतके' नवे रुग्ण..जाणून घ्या आकडेवारी  

corona
corona

मुंबई : मुंबईत आज 354 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 90,149 झाली आहे. तर आज 73 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 5,202 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 2183 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 

हेही वाचा: दुर्दैवी! मुंबईत प्लाझ्मा दान एक टक्काही नाही; पालिका करणार कोविड विजेत्यांना संपर्क.. 
                                                     
मुंबईत आज नोंद झालेल्या 73 मृत्यूंपैकी  58 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 53 पुरुष तर 20 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी  दोघांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 55 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 16 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                         

मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 905 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 62,736 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 2183 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  61,934 रुग्णांना घरी सोडण्यात आले.           

                                                      
मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 68 टक्के इतका आहे. तर 9 जुलै पर्यंत एकूूूण 3,79,554 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 3 जुलै ते 8 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.41 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 49 दिवसांवर गेला आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 
corona patients crosses 90 thousand mark in mumbai today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com