कोरोनाची भिती आहेच! पण पोटाचाही प्रश्न आहे, काम तर करावंच लागणार...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

स्थलांतरीत मजूर मुंबईत वेगाने परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील अनेकांनी मुंबई तसेच महाराष्ट्रात कोरोनाची धास्ती आहे तसेच काही काम नसल्याने खायला मिळत नाही. गावात जाऊन काम करु असे सांगितले होते, पण आता त्यातील अनेकांनी परतण्यास सुरुवात केली आहे.

 

मुंबई ः स्थलांतरीत मजूर मुंबईत वेगाने परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील अनेकांनी मुंबई तसेच महाराष्ट्रात कोरोनाची धास्ती आहे तसेच काही काम नसल्याने खायला मिळत नाही. गावात जाऊन काम करु असे सांगितले होते, पण आता त्यातील अनेकांनी परतण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

गावाकडील घरच्यांनी आग्रह धरला. इकडे तर या, काम मिळेल असे सांगितले होते. प्रत्यक्षात गावाकडे काहीच काम नाही. आमचा काही गावाकडे उद्योग नाही, मग कमाई कशी होणार. घरच्यांचा मुंबईत परतण्यास विरोध होता, पण पोटाचे काय हा प्रश्न होताच, त्यामुळे कोरोनाची भिती असतानाही आलो, असे मुंबईत परतत असलेले स्थलांतरीत मजूर सांगतात. 

आम्ही मुंबईत जे काम करीत होतो, ते गावाकडे नाही. तिथे काय काम करणार, अशी विचारणा करणाऱ्या काहींनी आम्ही मुंबई पुण्यात कामाला जात नाही. महाराष्ट्रात अन्य ठिकाणी जात आहोत, तिथे काही फारसे कोरोना रुग्ण नाहीत, असे काहींनी लक्ष वेधले. 

ठाण्यातील लॉकडाऊनबाबत सावळा गोंधळ, पोलिस आणि महापालिकेत समन्वय नाही का ?

अर्थात सगळेच परतण्यास तयार नाहीत. काहींनी मनरेगा अंतर्गत उत्तर प्रदेशात काम मिळत आहे तसेच काहींनी शेतीला हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचा प्रवास खूपच त्रासदायक झाला त्यांची परतण्याची अजून तयारी नाही.  सध्या कायम स्वरुपी नोकरी असलेलेच परतत आहेत, असा दावाही काहींनी केला तर काहींनी ज्यांना साहेबांचा कॉल आला, तेच परत येत आहेत, असेही सांगितले जात आहे. 

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..
मुंबईतून जाताना अनेक स्थलांतरीत कामगारांकडे भरपूर सामान होते, पण परतत असलेल्यांकडे फार तर एक पाठीवरची बॅग दिसत आहे. त्यातच त्यांना पंधरा दिवसात विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे विलगीकरण संपले की काम सुरु होईल आणि त्यानंतर  घरी पैसे पाठवता येतील असे स्वप्न ते बघत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is scared! But there is also the problem of income source, work has to be done ...migrant labour said