आधीच उशीर होत असलेल्या प्रायोगिक रंगभूमीचे काम कोरोनामुळे रखडले

आधीच उशीर होत असलेल्या प्रायोगिक रंगभूमीचे काम कोरोनामुळे रखडले

मुंबई ः प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर राज्यातील पहिले प्रायोगिक रंगभूमी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. मार्च अखेरपर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण होणार होते; मात्र सध्या कोरोनामुळे नाट्यगृहाचे काम रखडले आहे. आता कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आल्यावरच या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. 

नोव्हेंबर 2019 प्रायोगिक रंगभूमी नाट्यगृहाच्या कामास सुरूवात झाली होती. नाट्यगृहाची ही जागा गेली 18 वर्षे वापराविना असल्याने येथे काम करण्यात अनेक अडचणी होत्या. फेब्रुवारी महिन्यात नाट्यगृहाचा ढाचा तयार झाला होता. नाट्यगृहाचे छत आणि फरसबंदीचे काम पूर्ण झाले असून रंगमंच, सुशोभीकरण, रंगकाम, फरश्या, विद्युत पुरवठा आदी अनेक कामे बाकी आहेत. या नाट्यगृहाची आसन व्यवस्था जपानवरून मागवण्यात आली; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जपानहून येणारे साहित्य येणे अशक्य झाले, अशी माहिती पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रभारी संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.

प्रायोगिक नाट्यगृह आणि बहुउददेशीय सभागृहाच्या कराराप्रमाणे नाट्यगृहाचे बांधकाम मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काम स्थगित झाले आहे. हे नाटयगृह सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारले जात आहे. तत्कालीन सांस्कृतिक मंत्र्यांनी हे नाट्यगृह मार्चपर्यंत रसिकांसाठी खुले होईल, असे सांगितले होते. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि आता कोरोना विषाणूच्या फैलावामुळे नाट्यगृहाचे काम खोळंबले आहे. 

कोरोना विषाणूंमुळे निर्माण झालेली परिस्थिती जोपर्यंत आटोक्यात येत नाही, तोपर्यंत नाट्यगृहाचे काम थांबवण्यात येत आहे. तसेच नाट्यगृहाची आसान व्यवस्थाही जपानहून आलेली नाही. त्याचीही प्रतिक्षा आहे –

बिभीषण चवरे, प्रभारी संचालक, पु.ल.देशपांडे कला अकादमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com