आत्महत्येनंतर महिलेचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह; पोलिसांनी पतीविरुद्ध दाखल केला गुन्हा..वाचा बातमी 

corona
corona

मुंबई: चेंबूर येथील 31 वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येनंतर आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी कायद्या अंतर्गत पोलिसांनी तिच्या सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अहवालात या महिलेला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चेंबूर येथील गांधी मैदानाजवळील एका इमारतीमुळे 22 जूनला एका महिलेला आत्महत्या केली होती. याप्रकरणातील तक्रारीनुसार, ही महिला लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून 2014 मध्ये पतीच्या संपर्कात आली होती. आरोपी पतीचे चेंबूर परिसरात दोन कपड्यांची दुकाने आहेत. दोघांचाही यापूर्वी घटस्फोट झाला होता. 

काही दिवसांच्या बोलण्यानंतर दोघांनीही 2015 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला 50 लाख रुपयांचा हुंडा मागण्यात आला. पण विवाहितेच्या कुटुंबाने 25 व दागिने दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतरही खाद्य पदार्थाचे दुकान सुरू करण्यासाठी 50 लाख रुपये आणण्यासाठी मृत महिलेवर दबाव टाकण्यात आला. 

त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या ही महिला वैद्यकीय उपचारही घेत होती. तिने याबाबत कुटुंबिय व बहिणीलाही सर्व सांगितले होते. मृ्त्यूच्या आदल्या दिवशीही या महिलेने कुटुंबियांना संदेश पाठून प्रचंड मानसिक तणावाबाबत सांगितले होते.

याप्रकरणी महिलेच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात तिला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर महिलेच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

शवविच्छेदन अहवालादरम्यानच या महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. या महिलेला कोणाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली, याबाबत माहिती मिळाली नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. महिलेचा अंतिम शवविच्छेदन अहवाल प्रलंबीत असून त्यात महिलेला मारहाण झाली होती का, याबाबतची माहिती स्पष्ट होईल. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणतीही अटक झाली नसल्याचे अधिका-याने सांगितले.

corona test of late woman came positive read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com